• भारत सरकार व युनिसेफ अंतर्गत संजीवन विद्यानिकेतन या प्रशालेची स्वच्छ शाळा व सुंदर शाळा याकरिता राष्ट्रीय पातळीवर निरिक्षण करण्यात आले.   • नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात साजरा......संस्कृत कवी कालिदास यांची जंयती विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांतून उत्साहात साजरी....  • संजीवन विद्यानिकेतन मध्ये लोकराजा शाहु जंयती उत्साहात साजरी......  • संजीवन विद्यानिकेतन मध्ये कृषी दिन व डॉक्टर्स डे उत्साहात साजरा......  • Hurry up.. Admins are open...

Why Sanjeevan

   आजमितिस शिक्षणाचा आणि ज्ञानाचा प्रचार -प्रसार खेडोपाडी देखील पोहोचला आहे. गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत, प्रशालेची बससुविधा आपल्या बाळांना शाळेत नेण्यासाठी आपल्या दारी येत आहे., शिक्षणाच्या अशा संक्रमणकाळामध्ये देखील संजीवन शैक्षणिक आणि वसतिगृहात्मक सुविधा, कला, क्रीडा,गीत-संगीत आणि सर्वात महत्वाचे असे सुसंस्कारी ज्ञानदान विद्यार्थ्यांना प्रदान करून विद्यार्थ्यांमधील सुप्तकलागुणांना आणि चांगुलपणाला आकार दिला आहे. ज्ञानदान आणि ज्ञानार्जनाने तृप्त समाधान, अत्यंत आपुलकीची अन् जिव्हाळ्याची वागणूक माणूसपणा जपणारी कलागुणाना वाव देणारे गुणग्राहक व्यवस्थापनाची शिवभूमी पन्हाळ्याचा एेतिहासिकआणि सुरम्य परिसर, तज्ञ, व्यासंगी, गुरूजन, कर्तुत्वाच्या पंखांना भरारी देणारी शैक्षणिक आणि सह-शैक्षणिक दालने चिमनपाखरांना राजहंसाच्या रुपात जणू नवजीवन देतात आणि संजीवनसृष्टीच्या तळव्यावर स्व-जीवनाचे संजीवन होते. आणि म्हणून संजीवन ज्ञानसृष्टी ही सुसंस्कारीत ज्ञानसाधेचा आदर्श मानदंड सिध्द होते.