• गणित प्राविण्य परीक्षा पात्र विद्यार्थी, प्रथमेश इंगळे- इ, 8 वी, स्वराज जाधव- इ, 8 वी, संदेश भोसले- इ, 8 वी सर्व यशस्वितांचे व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन   • कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित, नाट्यछटा स्पर्धा- कु. प्रथमेश निकम, इ. 10 वी, प्रथम क्रमांक, श्री महेंद्र कुलकर्णी – लेखन व दिग्दर्शन- प्रथम क्रमांक सर्व यशस्वितांचे व मार्गदर्शकांचे हार्दिक  • कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित नाट्यवाचन व नाट्यछटा स्पर्धा 2018 - संजीवन विदयानिकेतनची उज्ज्वल यशाची परंपरा कायम... नाट्यवाचन मुली सांघिक –तृतीय, श्री, रवी पाटील – दिग्दर्शन –द्वितीय क्रमां  • कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित नाट्यवाचन व नाट्यछटा स्पर्धा 2018 - संजीवन विदयानिकेतनची उज्ज्वल यशाची परंपरा कायम.... नाट्यवाचन मुली - वैयक्तिक अभिनय - कु. गायत्री कुलकर्णी- इ 7 वी प्रथम  • FIRST TERMINAL EXAM BEGINS FROM MONDAY, 29 OCT ,2018  • इ. 5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी दि. 28/8/2018 पासून सुरू.  • संजीवन विद्यानिकेतन मध्ये पवित्र आणि मंगलमय वातावरणात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा.   • संजीवन विद्यानिकेतन मध्ये सर्व गुरूजनांचे इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांकडून आंबा रोप व श्रीफळ रोप देऊन सत्कार......  • आषाढी एकादशीच्या औचित्याने संजीवन विद्यानिकेतन या प्रशालेमध्ये आयोजित केलेल्या अभंग गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण आदरणीय पालक महोदय श्री. धोंडीराम शिरकांडे व श्री नितिन कदम यांचे हस्ते संपन्न.....  • भारत सरकार व युनिसेफ अंतर्गत संजीवन विद्यानिकेतन या प्रशालेची स्वच्छ शाळा व सुंदर शाळा याकरिता राष्ट्रीय पातळीवर निरिक्षण करण्यात आले.   • नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात साजरा......संस्कृत कवी कालिदास यांची जंयती विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांतून उत्साहात साजरी....  • Hurry up.. Admins are open...

History

महाराष्ट्र भूमी----- ज्ञानसाधनेची भूमी ---- या भूमीला ज्ञानवंतांची मांदियाळी लाभली आणि मराठमोळी ज्ञानप्रज्ञा विश्वांकीत जाहली ----- ज्ञानसाधनेचा हा निर्मळ झरा शिवसखा पन्हाळ्याच्या पश्चिमेला संजीवन रूपामध्ये जन्म घेतो आणि संजीवन नौलेज सिटी हे नावज्ञानक्षितिजावरील प्रज्ञासुर्य म्हणून तळपू लागते. 

ज्ञानसाधनेची ही गाथा 21वर्षांपासूनची     

21 जुने 1994 रोजीशिवसखा अंबारखान्याच्या इतिहास सृष्टीमध्ये संजीवन संस्काराची ज्ञानसाधना सुरूझाली. हातकणंगले तालुक्यातील बाहुबलीच्या निसर्गरम्य कुशीतील नरंदेग्रामी एकासामान्य शेतकरी परिवारामध्ये श्री. पी. आर. भोसले सर यांचा जन्म झाला.नरंदे गावच्या बांधावर सरांचे बालपण मोठे झाले. कोल्हापूर-वडगाव-मिरज या ठिकाणी ज्ञानार्जन पूर्ण करून सर पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका निवासी प्रशालेमध्ये  वसतिगृह अधिक्षक आणि क्रीडाप्रशिक्षक म्हणून रुजू झाले. अल्पावधितीच सरानी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून लौकिक प्राप्त केला. तथापि नियतीच्या मनात संजीवन स्वप्न रुजू लागले होते म्हणूनचकी काय जीवन प्रवासाच्या वळणावर स्व-अस्मितेला आवाहन करणाऱ्या काही  घडल्या आणि सरानी तेथील सेवेचा त्याग करूनपन्हाळ्याच्या अंबरखान्यामध्ये संजीवन पब्लिक स्कूल या  इंग्रजी माध्यमाच्या निवासी प्रशालेचा शुभारंभकेला. कोणत्याही स्वरूपाचा राजकीय वारसा आणि आर्थिक पाठबळ नसताना निवडक सोबतीनेअवघ्या सात चिमणपाखरांच्या सवे सरांनी संजीवन ज्ञानसाधनेच्या श्रीगणेशा केला. पालकहेच दैवत आणि विद्यार्थी हीच संपत्ती या उद्दात संकल्पाच्या ओंजळीत ज्ञानसाधनेची21 वर्षे सुफळ सार्थक झाली. आज मितीस 70 एकराच्या ज्ञानसंकुलाच्या रम्यज्ञान संकुलामध्ये साडेचार हजार ज्ञानार्थी आणि साडेसातशे कर्मचारी ज्ञानदानाच्यापुनीत वाटेवर स्वजीवनाचे संजीवन करीत आहोत. नर्सरी ते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रूपामध्ये मोहोरलेल्या संजीवन ज्ञानसृष्टीचा ज्ञानगंध आजसह्याद्रीच्या गिरीकुंडामध्ये दरवळत आहे. याचा आम्हास स्वार्थाभिमान आहे.